ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यातील वास्तव्यानंतर पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ

पुणे, दि. २० - पुण्यातील दोन दिवसांचा  मुक्कामक आटपून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' हा जयघोषत विठ्ठल भक्तांची वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. गेले दोन दिवस अभंग आणि भजनांच्या गजराने संपूर्ण पुणे नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी काल पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज या पालख्या पंढरीच्या दिशेने वाजता मार्गस्थ झाली   तुकाराम महाराजांची पालखीच पुढील मुक्काम लोणी काळभोर श्री विठ्ठल मंदिर येथे तर ज्ञानेश्वरांची पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे.

काल ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पुण्यात मुक्काम केल्याने पुण्यात उत्साहाचे वातावरण होते. पुणेकरांनी पालख्यांचे दर्शन घेतले. काल पुण्यात पाऊस नसल्याने अनेक नागरिकांनी पालख्या पाहण्यासाठी गर्दी केली. ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषाने काल पुणे अगदी वारीमय होऊन गेले होते. 

राज्यातून अनेक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आनंद दिसत होता. 'ग्यानबा तुकाराम', 'जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात असंख्य भाविक उत्साहाने वारीत सहभागी झाले आहेत. आषाढी वारीचा आनंद पुणेकरांनी अनुभवला.