ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

वारकरी संप्रदाय हा आजच्या युगातील सारथी - उल्हास पवार

पुणे, दि. २० - विचार, विवेक, वैराग्य आणि वैभव या चार गोष्टींचा संगम म्हणजे वारी. रथी महारथी होण्यापेक्षा सारथी होऊन तत्वज्ञान सांगता येते हे भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिले. वारकरी संप्रदाय देखील सारथी होण्याचे काम करतो. त्यामुळे आजच्या युगात समाजाला योग्य दिशा दाखविणारा वारकरी संप्रदाय आपल्यासाठी सारथीचीच भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.

अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अभिषेक साप्ते स्मृती फाऊंडेशनतर्फे शंकरराव साप्ते यांच्या स्मरणार्थ माऊली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. . . . मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, अशोक कोकाटे, चंद्रकांत सणस, माजी नगरसेवक दत्ता सागरे, अशोक जाधव, दिपक साप्ते, पंडितराव रोकडे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरुप होते.

दीपक मानकर म्हणाले,  वारीमधून आचार-विचारांची शिकवण मिळते. वारी करणे म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची सेवा करताना ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक लागत नाही. त्यामुळे वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार झालेले असते. यामध्ये सामील झालेल्या वारक-यांमध्ये भगवंत स्वत: ऊर्जा निर्माण करून देतो.

अशोक जाधव म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये अखंडित वारी आणि मनोभावे विठ्ठलाची सेवा करणाºया वारकºयाचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात येतो. ... मंगला फुके या अतिशय समर्थपणे ५०० लोकांची दिंडी चालवत आहे. अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा त्या पार पाडत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. दिपक काळे यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व जाधव यांनी आभार मानले.