ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला तो मुसलमान म्हणून नाही - शरद पवार

पुणे, दि. २१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला हे सत्य आहे. परंतु अफझल खान शत्रू होता म्हणून त्याचा कोथळा काढला, तो मुसलमान होता म्हणून नाही. छत्रपतींची लढाई मुस्लिमांच्या विरोधी होती असे म्हणणं चुकीचे आहे.असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.ते पुण्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज सचित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, तेव्हा ज्ञान देण्याचे काम एका विशिष्ट समाजाकडे होते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिण्याच काम झाले आहे. वास्तविक पाहता इतिहास हा वास्तवतेच भान ठेवून लिहिला पाहिजे. चुकलेल्या व्यक्तीला शिक्षा देण्याचे काम महाराजांनी केले आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो. तेव्हा ज्ञान काही लोकांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला आणि शिवाजी महाराजांचा संघर्ष मुसलमाना पुरता मर्यादित ठेवला

महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितलेले शिवाजी महाराज खरे आहेत. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे महाराज हे सर्व कुळांचे प्रतिपालक आहेत. त्यांच्या सैन्यात महत्वाच्या जागेवर सगळ्याच जातीचे लोक होते.