ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेत ३४ गावे समावेशा बाबत आज महत्वपूर्ण निर्णय

पुणे, दि. २१ - पुणे महानगरपालिकेच्या हद्दी लगतची ३४ गावे समावेश करण्या विषयी उच्च न्यायालयाने गावे समाविष्ट करण्याच्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान तीन आठवडयामधे निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रलयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकी मध्ये ३४ गावे समावेशा बाबत आज महत्वपूर्ण निर्णयहोण्याची शक्यता आहे 

तसेच या या बैठकीनंतर गावांचा महापालिका हद्दिमधे समावेश करण्याबाबत अंतिम प्रतिज्ञानपत्र तयार करुन न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून देण्यात आली आहे.

 हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.तर विभागीय आयुक्तानी गावे समविष्ठ करण्याबाबत १२ जुनला राज्य शासनाकड़े अहवाल सादर केला असून या अहवालावर अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याने या कामासाठी थोडसा कालावधी देण्यात यावा.असे शासनाकडून न्यायालयास सांगण्यात आले होतेत्याचबरोबर गावे समाविष्ट करण्याबाबत आमचा कल असल्याचे या अगोदरच न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे यंदाच्या ३४ पैकी १९ गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तर आता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत काय निर्णय घेतला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.