ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

येरवड्यातील बालसुधारगृहातून आठ मुले पळाली

पुणे, दि. २१ - येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातून शुक्रवारी (१६जून) रात्री अंधाराचा फायदा घेत आठ मुलांनी पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाईट गेल्यानंतर लोखंडी दरावाजा तोडून मुले पसार झाली आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून, बालसुधार केंद्रातून सतत मुले पळून जाण्याच्या घटनांमुळे येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले  आहेत. नेहरु उद्योग केंद्रातील काळजी वाहक सचिन शिंदे यांनी पोलिसांकडे मिसींग दाखल केली आहे. त्यानुसार, येरवडा पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मुलांना बाल न्यायालयाकडे हजर केले जाते. त्यानंतर त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येते. अशा मुलांना येरवडा परिसरात असणार्या पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात ठेवले जाते. याठिकाणी पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणची मुलेही असतात. दरम्यान शहरात शुक्रवारी रात्री मोठा पाऊस आला होता. त्यावेळी येरवडा परिसरातील तसेच केंद्रातील लाईट गेली होती. त्याचाच फायदा घेऊन आठही मुले केंद्रातील लोखंडी तसेच लाकडी दरावाजा तोडून तसेच येथील कर्मचार्यांची नजर चुकवून पसार झाली. काळजी वाहक इतरांनी या मुलांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे या मुलांची मिसींग दाखल केली आहे