ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बोट घेऊन राष्ट्रवादीचे नाले सफाई विरोधात अनोखे आंदोलन

पुणे, दि. २३ - कर्जरोखे नंतर आता नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट बोट घेऊन पुणे महापालिकेत प्रवेश करत अनोखे आंदोलन केले. तसेच ऐन पावसाळ्यात नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांवर बोटीने प्रवास करायची वेळ आली आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. 

नाले सफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. याची महापौर टिळकांकडून तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आदेश देऊनही योग्य त्या प्रकारे नाले सफाई झाल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या होत्या. यावर अधिका-यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले होते. तसेच महापौर टिळकांनी स्वतः देखील नाले सफाईच्या कामावर नाराजी दर्शविली होती. एवढ्या घडामोडी नंतर अद्यापही नाले सफाईचा प्रश्न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज या विरोधात आक्रमक होऊन अनोखे बोट आंदोलन केले.

यावेळी नगरसेवक योगेश ससाणे आणि सायली वांजळे यांनी बोटी घेऊन महापालिकेत प्रवेश केला. तसेच नाले सफाईच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी नाले सफाई झाल्याने पुणेकरांना गाडी सोडून बोटीने प्रवास करावा लागत आहे, अशीही टीका करण्यात आली.