ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

शहीद संदीप जाधव आणि श्रावण मानेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे, दि. २४ - जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप यांचे एक दिवसापूर्वीच आपल्या वडीलांशी बोलणे झाले होते. गुरुवारी रात्री त्यांच्या वीरमरणाची बातमी कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले हे.

विशेष म्हणजे आज, शनिवारी संदीपच्या मुलाचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवही आज सकळी त्यांच्या मूळगावी गोगवे येथे आणण्यात आले असून थोड्यावेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने नियंत्रण रेषेवर गुरुवारी रात्री भ्याड हल्ला केला होता. ज्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले. ३५ वर्षीय संदीप जाधव गेली १५ वर्ष लष्कराच्या सेवेत होते, तर २५ वर्षीय माने वर्षांपूर्वीच सेवेत रुजू झाले होते.