ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडी कॉप सावलीप्रमाणे काम करेल - रश्मी शुक्ला

पुणे, दि. २४ - महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉपची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडी कॉप अगदी सावलीप्रमाणे त्यांची सुरक्षा करेल. त्यामुळे बडीकॉपला आपले माना, असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी आयटी तरुणींना केले आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्हॉटस् अॅपवर पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने "बडीकॉप' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गतच सिटी सेफ हे फेसबुकपेज ही तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर नोकरदार महिलांनी विशेष करून आयटी क्षेत्रातील महिलांनी करावा यासाठी हिंजवडी फेज मधील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी या कंपनीत चर्चा सत्राचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सह आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त शशीकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सायबर सेलचे नोडल ऑफिसर आणि बडी कॉपचे प्रमुख सुधीर हिरेमठ, राधिका आपटेसहआयुक्त विक्रम पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, वाकडचे श्रीधर जाधव, दयानंद ढोमे आदी उपस्थित होते.

यावेळी सायबर कन्सलटंट तज्ज्ञ म्हणून पोलीस प्रशासनाला मदत करणारे पंकज घोडे, प्रणित कुमार, रविराज मराठे यांच्यासह आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बडी कॉप, सिटी सेफ ही संकल्पना समजावून सांगितली.

यावेळी रश्मी शुक्ला म्हणाल्या कीतुम्ही जिथे असला तिथे बडी कॉप तुमची सावली बनून संरक्षण करेल. बडी कॉपला केवळ एक यंत्रणा मानता तुमचा जवळचा मित्र माना. तुम्हाला संशयास्पद आणि धोकादायक वाटणा-या गोष्टीबद्द्ल मनमोकळेपणाने आमच्याशी किंवा बडी कॉपशी बोला. बडी कॉप किंवा सिटी सेफ वरील पोलीस कर्मचारी अपडेट नाही राहिला तर थेट मला संपर्क करा, असेही शुक्ला यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही यंत्रणा पुणे पोलीस दल महाराष्ट्रात क्रमांक एकला असल्याचे त्यांनी नमूद केले तर हिंजवडी सह शहरात येरवडा, Posted On: 24 June 2017