ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भुशी धरण ओव्हर फ्लो, ईद निमित्त निसर्गाचीही पर्यटकांना ट्रिट

लोणावळा, दि. २६ - पावसाळा म्हटले की, पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण कधी ओव्हर फ्लो होते याची वाट पहात असतात.यावर्षी भुशी धरण ईदच्या दिवशीच ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळाली आहे. पर्यटकांची पंढरी अशी ओळख असलेले भुशी धरण आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या सांडव्यावरुन पायर्यांवर पाणी वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला.

गेल्यावर्षी भुशी धरण ५ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले होते. यंदा तो दिवस आधीच ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांमध्येही उत्साह पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून लोणवळ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे केवळ दोन दिवसातच भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी ४० टक्के असलेले धरण आज सकाळी ओव्हर फ्लो झाले आहे.

शनिवार रविवार आज ईदची सुट्टी यामुळे पर्यटकांना सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांसाठी हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. धरणाच्या पायर्यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला.