ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वरुण राजाच्या पुनरागमनामुळे चारही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

पुणे, दि. २६ - कमी दाबाचा पाट पश्चिम किनारपट्टीवर पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहेपुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह गेल्या 48 तासामध्ये चांगला पाऊस झाला असून यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

कमीदाबाचा पाट केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारित असल्याने पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आगामी चोवीस तासात राज्यात अनेक भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुण्यातही आज सकाळपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे शहरात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिक बाहेरपडून पावसाची मजा घेत आहेत तर काहीजण घरात बसूनच पावसाचा आनंद लुटत आहे. सकाळी पडणाऱ्या पावसाने काही प्रमाणात दुपारपर्यंत उसंत घेतली आहे. मात्र, ढगाळ वातावरण कायम होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासात शहरात पावसाच्या सरी कोसळणार आहे.

गेल्या ४८ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी सहा ते सोमवारी  सकाळी .०० या २४ तासात धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असून पानशेत, वरसगाव येथे प्रत्येकी ६१ मिमी तर खडकवासला येथे १८ मिलिमीटर तर टेमघर येथे ९८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. या चारही धरणातील मिळून .८३ टीएमसी म्हणजेच .७० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.