ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंढेंनी सील केलेल्या राष्ट्रवादी कामगार युनियनच्या कार्यालयाला अद्याप टाळा

पुणे, दि. २७ - पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी महिनाभरापूर्वी पीएमपीच्या इमारतीत असणाऱ्या राष्ट्रवादी कामगार युनियनच्या कार्यालयाला करारानुसार युनियनने दर महिन्याचे भाडे वेळेवर भरल्याचा ठपका ठेवत तसेच कार्यालयाच्या जागेची आवश्यकता प्रशासनाला असल्याचे सांगत सील ठोकले होते. मात्र, महिनाभरानंतरही या कार्यालयाला टाळे असून त्याचा वापर पीएमपीएमएलकडून करण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तत्परता दाखवत खाली करण्यात आलेले कार्यलय तितक्याच तत्परतेने वापरात का आणले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पीएमपीच्या स्वारगेट येथील कॅन्टीन बिल्डिंगमधील तळमजल्यावर पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे भाड्याने कार्यालय होते. पीएमपी आणि युनियनमध्ये झालेल्या करारानुसार सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१७ या तीन वर्षाच्या काळासाठी युनियनला भाड्याने हे कार्यालय दिले होते. भाडेकराराची मुदत संपण्यास तीन महिने बाकी असतानाही हे कार्यालय पीएमपी प्रशासनाने २३ मे रोजी बळाचा वापर करून ताब्यात घेतले.

भाडेकरार मुदत संपण्यापूर्वीच कार्यालयाची जागा पीएमपीच्या ताब्यात देण्यास युनियनचा विरोध होता. त्यासंबंधी युनियनने विधीज्ञांमार्फत पीएमपी प्रशासनाला नोटीसही पाठविली होती. पण तरीही पीएमपी प्रशासनाने कार्यालय ताब्यात घेतले. युनियनने दरमहा भाडे नियमित भरता ते उशिरा भरल्याने आणि या कार्यालयाच्या जागेची पीएमपीला गरज असल्याने ते ताब्यात घेतल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले होते. या घटनेला शुक्रवारी (दि. २३) एक महिना पूर्ण झाला. ‘पीएमपी प्रशासनाने कार्यालयाचा अजून काहीही वापर सुरू केलेला नाही. त्यामुळे मुंढेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.