ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यात ६०० चौ. फुटांपर्यंत अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफीस मंजुरी

पुणे, दि. २८ - पुणे महापालिका हद्दीतील ६०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफीचा प्रस्ताव आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे आता लहान सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने मिळकतकराच्या शास्तीचे अधिकार महापालिकांना दिले आहेत. जानेवारी २०१७ ला महापालिका अधिनियमात यासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर करण्यात येणार्या शास्तीमध्ये एकवाक्यता असावी अल्प उत्पन्न घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने महापालिकांना निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

अनधिकृत बांधकामावर प्रभावी आळा बसविण्याकरिता शास्तीसंदर्भात महापालिकांना राज्य शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे आता शहरामधील ६०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी अनधिकृत बांधकामास यापुढे करआकारणीची कोणतीही शास्ती करण्यात येणार नाही. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ६०१ चौरस फूट ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी अनधिकृत बांधकामास प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या ५० टक्के शास्तीची करआकारणी करण्यात येईल. १००१ चौरस फुटांच्या पुढील मिळकतींना दुप्पट करआकरणी करण्यात येईल. महापालिकेने २००८ पासून निवासी बांधकामांना दुप्पट करआकरणीचा निर्णय घेतला आहे. मुख्य सभेच्या मान्यता दिल्यामुळे नवीन दराने करआकारणी करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रात ६००  चौरस फुटांपेक्षा लहान ९५२१ घरे असून त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहेत तर तर ६०० ते १००० चौरस फुटांची २३६५ सदनिका आहेत. या निर्णयामुळे एकूण ११८८६ सदनिकाधारकांना फायदा मिळणार आहे