ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंढे यांच्यामध्ये सभागृहापुढे येण्याची हिंमत नाही - नगरसेवकांचा आरोप

पुणे, दि. २८ - पुणे महानगर परिवहन महामंडळने शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या बसेसची भाडेवाढ केल्याच्या पीएमपी प्रशासनाच्या निर्णयावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगऴवारी मुख्य सभेत जोरदार ताशेरे ओढले. संचालक मंडळाला विश्वसात घेता मुंढे यांनी यासंदर्भात एकाधिकारशाहीने निर्णय घेतला असून आता सभागृहापुढे येण्याची त्यांची हिंमत नाही, अशी घणाघाती टीकाही सभासदांनी केली. तसेच त्यांना सभागृहात बोलून खास सभा सभा घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात अली.

विद्यार्थ्यांसाठीच्या बसेसची भाडेवाढ केल्याच्या निर्णयाचे पडसाद मु्ख्यसभेतही उमटले. पीएमपीमध्ये महापालिकेचे साठ टक्के हिस्सा असताना कोणतीही विचारणा करता पीएमपी प्रशासनाने परस्पर ही भाडेवाढ केली आहे. विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी आहे. अनेक नादुरुस्त बसेस रस्त्यावर पाठविल्या जातात, अशी तक्रार वैशाली बनकर यांनी नोंदविली. मुख्य सभेत पीएमपीच्या अधिकाऱ्याने उपस्थित रहावे यासंदर्भात महापौरांंनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे, अशी खंत योगेश ससाणे यांनी व्यक्त केली. पीएमपीएल अधिकाऱ्यांवर महापौरांचा वचक असणे आवश्यक आहे, असे मत बाबूराव चांदेरे यांनी मांडले, तर पीएमपीचे अधिकारी परस्पर निर्णय घेतात, याचा अर्थ त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही, अशी टीका सुभाष जगताप यांनी केली.

बसभाडेवाढीचा निर्णय व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला असून संचालक मंडळाला विचारणा केलेली नाही, असा खुलासा आयुक्त कुणाल कुमार यांनी केला. दैनंदिन कामकाजाचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले असून धोरणात्मक निर्णयाचे अधिकार संचालक मंडळाला आहेत. यासंदर्भात उद्या (बुधवारी) दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात या प्रश्नी चर्चा केली जाईल, असेही आयुक्तांनी आपल्या खुलाशात नमूद केले.