ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शरद पवार हे आमचे पूर्वी मित्र होते, आता नाहीत - रामदास आठवले

पुणे, दि. २८ - शरद पवार हे पूर्वी आमचे मित्र होते, पण आता नाहीत. त्यांच्याकडूनच मी राजकारण शिकलो. राजकारणात एकाच ठिकाणी जास्त काळ राहणे धोक्याचे असते. त्यामुळेच मी शरद पवारांना सोडून नरेंद्र मोदींकडे आलो. हवेचा रोख ज्या दिशेने असेल त्या दिशेने जाणारेच राजकारणात यशस्वी होतात. आता पुढची दहा वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडत नाही, मग हवेचा रोख पाहून पुढचे पाहू, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या कवी संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या कवितांनी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी भरत दौंडकर, बंडा जोशी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, माझा कवी होण्याचा विचार होता, पण कवी झालो असतो तर उपाशी राहण्याचीच वेळ आली असती. त्यामुळे मी माणसांत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज देशातील 28 राज्यांत माझा पक्ष आहे, प्रत्येक गावागावत माझे कार्यकर्ते आहेत, जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.