ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

साहेब मुंढेंना परत बोलवा - महापौर टिळकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुणे, दि. २९ - पुणे महापालिकेचा पीएमपीएमएलमध्ये ६० टक्के वाटा आहे. मात्र, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे मालक असल्यासारखे वागत असून पालिकेचे बस सेवेविषयी असणारे प्रश्न ऐकूण घेण्यास तयार नाही. त्यामुळे असा अधिकारी सुधारणा करू शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुंढे यांना पुन्हा बोलवून घेण्याची विनंती करणार आहे, असे महापौर मुक्त टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय बसच्या भाड्यामध्ये केलेल्या दरवाढीमुळे तुकाराम मुंढे आणि महापालिका पदाधिकारी हा वाद चांगलाच रंगला आहे. मुंढेंची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन करणारे पदाधिकारी काही महिन्यातच मुढेंना वैतागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

पीएमपीएमएलकडून शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बस सेवेचे दर ६१ वरून १४१ करण्यात आले आहे. या दरवाढीने एकीकडे पालक आणि दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधा-यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत पीएमपीएमएल संचालकांची बैठक बोलवण्यात अली होती. या बैठकीला मुंढे उपस्थित राहणार होते. मात्र, ऐन वेळी मुंढेंनी  बैठकीला दांडी मारत दोन अधिकारी या बैठकीला पाठवले होते. मात्र, या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे ही बैठक झाली नाही.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महापौर म्हणाल्या की, मुंढे यांनी आज बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ऐन वेळी त्यांनी  गैरहजर राहून महापालिकेचा अपमान केला आहे. आजच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचा अत्यंत संवेदनशील विषय तसेच, एक दिवसाच्या पासची केलेली दरवाढ, हेल्पलाईनमध्ये येणाऱ्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, एकंदरीतच या बैठकीला उपस्तिथ राहता या गोष्टींना त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारे पीएमपीएमएलचा विकास होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुंढे यांना परत बोलवण्याची विनंती करणार आहे, असे महापौरांनी सांगितले.