ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोणावळ्यात पाच दिवसात ६८० मिमी पाऊस, संततधार कायम

पुणे, दि. २९ - लोणावळा शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या शनिवारपासून सुरु झालेली पावसाची संततधार आजही कायम आहे. शहरात मागील पाच दिवसात तब्बल ६८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाच दिवस लोणावळ्यात सुरु असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यावर्षी पावसाळा पुर्वीची नदीनाले सफाईची कामे वेळेवर झाल्याने शहरात अनेक भागांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोणावळ्यात शनिवारी १५० मिमी, रविवार ५७ मिमी, सोमवार १८० मिमी, मंगळवार १०८ मिमी बुधवार १८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार आजही कायम आहे. मौसमी पावसामुळे लोणावळा खंडाळा परिसरातील ओढे नाले वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण, टायगरर्स लिप्स जवळील घुबड तलाव भरुन वाहू लागले आहे. वलवण तुंगार्ली धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. लोणावळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागल्याने शनिवार रविवार सह आठवड्याचे सातही दिवस लोणावळ्यातील रस्ते राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे

दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस आणि या कोंडीतून मार्ग काढताना स्थानिक नागरिक यांच्या मात्र नाकीनऊ येऊ लागल्याने सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून पावसासोबत हवादेखील मोठ्या प्रमाणात सुटू लागली आहे. लोणावळ्यात आज अखेर १०५४ मिमी पाऊस झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत तो खुप जास्त आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ २५० मिमी पाऊस झाला होता.