ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएमपीएमएल चालक संपावर, बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

पिंपरी, दि. २९ - भाडेतत्वावर चालवण्यात येणा-या पीएमपीएमएलच्या ४४० ठेकेदारांच्या बस चालकांनी आज (गुरुवार) दुपारी दोन वाजल्यापासून अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बसव्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी मुंढे यांनी डेपोतील सर्व बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुर्तास तरी बस व्यवस्था सुरळीत आहे. असे असले तरी ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे पीएमपीएमएल प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे

पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या माध्यमातून बस सेवा पुरवण्यात येते. यासाठी पीएमपीएमलकडे तब्बल हजार ५०० बस आहेत. त्यातील ७०० च्या जवळपास ठेकेदारांच्या बस आहेत. या बस भाडेतत्वावर चालवण्यात  येतात. यातील ४४० ठेकेदारांच्या बस चालकांनी अचानक दुपारी दोन पासून संप पुकारला आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बसव्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक पुकारलेल्या या संपानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डेपोतील सर्व बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप तरी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. 

या संपाबाबत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष हे म्हणाले की, ठेकेदाराच्या चालकांनी अचानक संप पुकारला असल्याने प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. या पार्श्वभूमीवर डेपोतील बस रस्त्यावर आणण्यात येत आहे. संबधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही मुंढे यांनी दिला.

मुंढे यांनी ब्रेक डाऊन तसेच इतर कारणास्तव ठेकेदारांकडून आकारलेल्या दंडामुळे ठेकेदारांच्या बस चालकांनी पूर्व सूचना देता अचानक संप पुकारल्याची माहिती मिळत आहे.