ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संपामुळे प्रवाशांचे हाल, संप मागे न घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पुणे, दि. ३० - पीएमपीएमएलच्या भाडेतत्वावर चालवण्यात येणा-या ठेकेदारांच्या ४४० बस चालकांनी आज (दि.२९ जून) दुपारी दोन वाजल्यापासून अचानक संप पुकारल्यानंतर सायंकाळपासून पिंपरी-चिंचवडसह शहराच्या इतर भागात जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे पुणे शहरातील अनेक बस स्टॉपवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तर बसची वाट पाहत खूप वेळ थांबावे लागल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी उद्यापर्यंत संप मागे घेतल्यास फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला असून स्वतः रस्त्यावर उतरून प्रवाशांशी संवाद साधला आहे.

दरम्यान, संपामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी पीएमपी प्रशासनाने २०० जादा बसेस आणि ४०० कामगारांना ओव्हरटाईम देत कामावर रुजू केले. आणि या बसेस बीआरटी मार्गावर धावणे शक्य नसल्यामुळे पर्यायी मार्गावरून त्या धावत आहेत. त्यामुळे संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत नसल्याची माहिती पीएमपीचे अधिकारी सुनिल गवळी यांनी दिली. शिवाय तुकाराम मुंढेसह प्रशासनातील अधिका-यांनी रस्त्यावर उतरत प्रवाशी, पीएमपीचे चालक, कंडक्टर यांच्याशी संवाद साधून योग्य त्या सूचना केल्या. मुंढे यांनी शहरातील डेक्कन, मनपा, टिळक रोड या भागातील बस स्टॉपला भेटी देत तेथील प्रवाशांशी संवाद साधला.

प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल महाविद्यालयीन विद्यार्थीनी कुसूम यादव म्हणाली, मी दररोज एफसी रोड ते निगडी या दरम्यान प्रवास करते. कॉलेज संपल्यानंतर .४५ वाजता असणारी बस .३० वाजले तरी अजून आली नाही. त्यामुळे मला ताटकळत उभे रहावे लागले. याशिवाय मनपा बस थांब्यावरील काही नागरिकांनाही बसला नेहमीपेक्षा जादा वेळ लागत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हा संप असाच सुरू राहिला तर नागरिकांचे हाल सुरुच राहतील.

पीएमपीच्या ताफ्यामध्ये गुरुवारी एकूण हजार ५३० बसेस होत्या. कंपन्यांच्या ५१५ आणि पीएमपीच्या हजार १५ बसेस होत्या. गुरुवारी दुपारनंतर कंपन्यांनी बसेस बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे पीएमपीला सुमारे