ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंढेंना परत न बोलावल्यास आरपीआयच्या वतीने आंदोलन

पुणे, दि. ३० - पीएपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे एकाधिकारशाहीने काम करत असून ते कोणालाही जुमानता आपलेच खरे करतात. एकप्रकारे ते पुणेकरांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने परत बोलवावे अन्यथा आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपमहापौर  डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिला आहे.

धेंडे म्हणाले, पीएमपीएमएलध्ये पुणे महापालिकेचा सर्वधिक ६० टक्के हिस्सा आहे. असे असतानाही मुढे यांनी शालेय वाहतूक करणा-या गाड्यांची भाडेवाढ केली. याचा परिणाम शहरातील अनेक शाळकरी मुलांना बसला आहे. पुणे महापालिका पीएमपीएमएलला संचलन तूट देत असतानाही, मुंढे यांनी संचालक मंडळासमोर प्रस्ताव ठेता हा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे मुंढे हे एककल्ली कारभार करत असून त्यांना परत राज्यशासनाच्या सेवेत बोलवून पुणेकरांना होणाऱ्या त्रासातून मुक् करावे, अशी मागणी धेंडे यांनी केली आहे.