ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यामध्ये मुकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे, दि. ३० - पुण्यातील कोथरूडमध्ये १६ वर्षीय मुकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पिडीत मुलीचे वडील हे अंध आहेत. आरोपीने मार्च २०१७ पासून पिडीतेवर वेळोवेळी अत्याचार केल्याच समोर आल आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे. वडिलांच्या फिर्यादीनुसार सहारूल इस्लाम अब्दुल वाहीद (वय २६, रा.आदर्श चौक, केळेवाडी, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा पिडीत मुलीच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने पिडीत मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या संबंधातून ती गर्भवती झाली असता तीला गर्भपात करण्यास भाग पाडले. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सह पोलीस निरीक्षक पंचीभाई अधिक तपास करीत आहेत.