ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तुकाराम मुंढे यांचे पदाधिकाऱ्यांना भोजनाचे निमंत्रण

पुणे, दि. १ - शालेय विद्यार्थ्यांच्या बस दरवाढ आणि भाडेतत्वावरील बस चालकांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी तुकाराम मुंढे आणि पालिकेचे पदाधिकारी यांच्यात स्वारगेट येथील पिएमपीच्या कार्यालयात काल (३० जून ) बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही प्रश्नांवर तोडगा निघाला असून तुकाराम मुंढे विरुध्द राजकारणी हा वादही निवळल्याची चिन्हे आहेत. कारण बैठकीनंतर झालेल्या अनौपचारीक गप्पात मुंढे यांनी मुक्ता टिळक यांच्यासह इतरांना भोजनाचे निमंत्रण दिले आणि महापौरांनी ते हसत-हसत स्वीकारलेही.

शालेय बस दरवाढ आणि भाडेतत्वावरील बस चालकांचा संप याविषयी तीन तास चर्चा झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि कंत्राटदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुंढेंनी उपस्थितांसोबत फोटो काढत सर्वांना घरी येण्याचे निमंत्रण दिले.

दरम्यान दोन दिवसापूर्वी मुंढे हेकेखोरपणा करत असल्याचे सांगत मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत बोलवावे असा आक्रमक पवित्रा घेतला होता. तर उपमहापौर डॉ. धेंडे यांनी मुंढेना राज्य शासनाने परत बोलावल्यास आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु काल झालेल्या बैठकीनंतर त्यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत.