ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएमपी भाडेतत्वावरील बस चालकांचा संप मागे; बससेवा पूर्ववत

पुणे, दि. १ - पीएमपी भाडेतत्वावरील बस चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला असून सायंकाळपासूनच बस रस्त्यावर धावणार असल्याचा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे तसेच पालिकेचे पदाधिकारी ठेकेदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

पीएमपीने आकारलेल्या अवास्तव दंड अमान्य करत पीएमपीच्या भाडेतत्वावरील बस चालकांनी काल गुरुवारी दुपारी दोन वाचल्यापासून अचानक बंद पुकारला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीच्या ताफ्यातील ज्यादा बसेस रस्त्यावर उतरविल्या होत्या. तसेच याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही मुंढे यांनी दिला होता. अखेर महापौर टिळक यांच्या पुढाकाराने स्वारगेट येथील पीएमपीच्या कार्यालयात तुकाराम मुंढे, पालिकेचे पदाधिकारी ठेकेदार यांच्यामध्ये चर्चेसाठी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ठेकेदारांनी संप मागे घेतला असून आतापासूनच बस तातडीने रस्त्यावर धावणार आहे. तसेच भाडेतत्वावरी शालेय बसच्या दरवाढीबाबत देखील निर्णय झाला असून ६६ रुपये किमी इतका दर निश्चित करण्यात आला आहे. तर उर्वरित अनुदान महापालिका देणार आहे.