ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे - नगर रोडवर मिनी बस-टँकरच्या धडकेत ७ जण ठार

पुणे, दि. ३ - पुणे- नगर हमरस्त्यावर लोणीकंद गावाजवळ नातेवाईकांच्या लग्नावरून परत येणारी टेम्पो ट्रव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर पाठीमागून येणारी कारही टेम्पोला धडकली. या अपघातात जण ठार झाले असून ३ जण जखमी आहे. तर कारच्या पुढील भागाचा चुराडा झाल आहे. सायंकाळी साडेसात वाजता हा भीषण अपघात झाला. दरम्यान, जखमींवर वाघोलीतील आयमॅक्स लाईफ लाईन केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैभव माने (वय २७, रा. म्हाळुंगे-बाणेर), महेश वसंत पवार (वय २८, रा. सासवड ता. पुरंदर), नुपूर शाहू (वय २६, रा. वनाज कॉर्नर), निखील जाधव (वय २६, रा. भोसरी), अक्षय दाभाडे (वय २८, रा. सांगवी), विशाल चव्हाण (वय २९, रा. विमाननगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुरेश सिद्रम गायकवाड (वय ४०), रणजित बाळासाहेब निकम (वय २९), शरद शांताराम सांडणे (वय २९, तिघेही रा. बाणेर), सुमित प्रमोद मोरे (वय २८, रा. म्हाळुंगे), गणेश विलास शिंदे (वय, २१ म्हाळुंगे -बाणेर), आयुष घेलोत (वय २६, रा. वनाज कॉर्नर), विलास बिरजदार (वय २७, बालेवाडी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यापैकी सुदेश, रणजित शरद यांच्यावर वाघोलीतील आयमॅक्स रुग्णालयात तर सुमित, गणेश, आयुष, विलास यांच्यावर वाघोलीतील लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टेम्पो ट्रॅव्हलर हा नगर रस्ताने भरघाव वेगात येत होता. यावेळी टँकर विरुद्ध दिशेने येत होता. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटून तो ट्रॅव्हल्सला समोरासमोर जाऊन धडकला. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचाही मृत्यू झाला. सर्व मयत जखमी हे अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर जवळील सोनई गावात नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. टेम्पो ट्रॅव्हलरची धडक झाल्यानंतर त्यापाठोपाठ येणारी कार देखील टेम्पोला धडकली. या अपघातात या कारचा संपूर्ण चुराडा झालेला आहे.