ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे मेट्रोला युरोपियन बँकेकडून ६०० दशलक्ष युरोचे कर्ज

पुणे, दि. ४ - पुणे मेट्रो प्रकल्पसाठी ८४५ मिलियन युरोची गरज असून यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडे भारत सरकारच्या अर्थव्यवहार विभागाने (डीइए) ६०० दशलक्ष (मिलियन) युरो इतक्या कर्जाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर दोन देशाच्या इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडून देखील अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुणे मेट्रोच्या विविध घडामोडींची माहिती देण्यासाठी आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दीक्षित बोलत होते. महामेट्रोचे कार्यकारी संचालक (स्ट्रॅटेजिक प्लानिंग) रामनाथ सुब्रमण्यम् आणि सल्लागार शशिकांत लिमये यावेळी उपस्थित होते. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ८४५ मिलियन युरोची गरज आहे. त्यापैकी ६०० मिलियन युरो कर्जाचा प्रस्ताव युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँके (इआयबी)कडे ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थव्यवहार विभागाने हा प्रस्ताव ठेवला आहे. उरलेल्या २४५ मिलियन युरोसाठी फ्रेंच डेव्हलपमेंट बँक (एएफडी) आणि जर्मन डेव्हलपमेंट बँक (केएफडब्ल्यू) यांच्याशी अर्थव्यवहार विभागाची बोलणी सुरू आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रोसाठी जी तरतूद करण्यात आली आहे, त्याच पैशातून सध्याची कामे सुरू आहे, असेही दीक्षित यांनी सांगितले.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर गोदाम, वनाज येथील कोथरूड कचरा डेपोची जागा आणि शेतकी महाविद्यालयाची जागा अशा तीन जागा मिळण्यासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून दोन महिन्यात या जागा ताब्यात येण्याची प्रक्रिया सुरू होईल. पिंपरी-चिंचवड परिसरात संत तुकाराम नगर येथेमेट्रो माहिती केंद्र सुरू होत असून, पुणे शहरातही लवकरच असे केंद्र सुरू होणार आहे. तसेच पिंपरीत कार्यशाळेसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जागा दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी ते रेंज हिल या भागाच्या कामाची निविदा निघाली असून, दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज ते शिवाजीनगर न्यायालय, या भागाच्या निविदा येत्या १८ जुलैला निघणार आहेत. मेट्रो स्थानकांच्या निविदांवरही काम सुरू असून, याही निविदा येत्या दोन महिन्यांत निघणार आहेत, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

प्रकल्पाबाबत काही लोकांना शंका आहेत, मेट्रोच्या या मार्गाचा फायदा केवळ टक्के शहराला होणार आहे, अशा वावड्या उठविण्यात येत आहेत. मात्र, ते खरे नसून ३१ किलोमीटरचे मेट्रोचे दोन मार्ग असून, त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकी अशा ६किलोमीटर परिसराला याचा थेट फायदा होणार आहे. तसेच बस, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ, असे सगळेच या मेट्रो मार्गांना जोडण्यात येणार असल्याने शहरातील ५० टक्के Posted On: 04 July 2017