ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फक्त नाष्टापाणी करण्यासाठी मुंबईला जातात - अजित पवार

पुणे, दि. ५ - पुण्याच्या भाजपच्या आमदारांचं मंत्रिमंडळात कुणी ऐकत नाही. हे फक्त नाष्टापाणी करायला मुंबईला जातात, अशा बोचऱ्या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भाजप आमदारांवर टीका केली

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते पुण्यात बोलत होते. पुणे शहराने विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर भाजपचे आमदार निवडून दिले आहेत. पालिकेपासून ते केंद्रापर्यंत राज्यात त्यांचीच सत्ता आहे. तरीही पुणेकरांची कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्याचा कारभार त्यांना नीट करता येत नाही. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यात समन्वय नाही, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या काही मंडळींनी जमीन हडप केल्या तरी कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली 

ते म्हणाले, "भाजपकडे बहुमताची सत्ता असतानाही शहराचे प्रश्न प्रलंबित आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या 34 गावांचा प्रश्न सुटलेला नाही. शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्ज काढावे लागले. मेट्रो अजूनही यार्डात आहे. त्यासाठी जागा मिळत नाही. त्याकडे कुणाचं लक्ष नाही. कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. पुण्याच्या सर्वच प्रश्नांवर सत्ताधारी भाजपला अपयश आलेले आहे.'' 

"स्मार्ट सिटीची घोषणा होऊन काही वर्षे झाली. मात्र यात काहीही प्रगती नाही. पुण्याला मंत्रिमंडळात मोठं स्थान आहे. आठही आमदार भाजपचे आहेत. तरी पुण्याचे प्रश्न सोडवण्यात त्यांना यश येत नाही, हे कशाचं चिन्ह आहे, असा सवाल त्यांनी केला. 
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष 15 वर्षे सत्तेबाहेर राहिले. त्यामुळे सेना भाजपचे फक्त तू मारल्यासारख कर, मी रडल्यासारखं करतो, असच सुरु आहे. सत्तेच्या ढेपेला चिटकलेले हे मुंगळे आहेत. ते सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत,'' अशा शब्दांत त्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला

मुख्यमंत्र्याना लक्ष्य करताना ते म्हणाले की कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच अभ्यास करणं सुरूच असतं. कुठला निर्णय घेतल्यानंतर त्यात काही तरी त्रुटी राहत आहेत. त्यावर काम सुरु आहे, चौकशी होतेय, एवढंच सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घोळही असाच सुरु आहे. मुंबईत शेतकरी कुठून हवेतून येतायत का, अशी विचारणा त्यांनी केली