ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गावक-यांतून सरपंच निवडीला राष्ट्रवादीचा विरोध - सुनील तटकरे

पुणे, दि. ६ - थेट गावक-यांमधून सरपंच निवडीमुळे गावाच्या विकासाला अडथळा निर्माण होणार असून हा निर्णय लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुधवारी ( जुलै) पुण्यात झालेल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आजोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.

तटकरे पुढे म्हणाले की, सरपंच नागरिकांमधून निवडला गेल्यास ग्रामीण भागात एकाधिकारशाही वाढेल. त्यामुळे देशाची  वाटचाल अध्यक्षीय पद्धतीकडे सुरू होईल. या निर्णयामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीद्वारे करण्यात येणाऱ्या कामात अडथळा येऊ शकतो. या निर्णयामुळे गावा-गावांतील विकासकामांना खीळ बसणार आहे. त्यामुळे सरपंचांची निवड ही लोकशाही मार्गानेच झाली पाहिजे. त्यामुळे सरपंच निवडीच्या नवीन पद्धतीला राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून विरोध करणार आहे.