ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शहीद जवानांना श्रद्धांजली, १६ जुलैला कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा

पुणे, दि. ७ - कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्या युद्धाच्या आठवणी जागृत करण्याच्या दृष्टीने पुण्यातील सरहद या संस्थेतर्फे १६ जुलै रोजी 'रन फॉर सरहद' कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकूण १६० किमी अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा कारगिल युद्धभूमीवर घेतली जाणार आहे.

कारगिल युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक कटू आठवण. पाकिस्तानबरोबर झालेल्या या युद्धात आपल्याला विजय मिळाला असला तरीही या युद्धात ५०० जवान शहीद झाले तर कित्येक जवान जखमी झाले. या युद्धाच्या आठवणींची प्रेरणा भारतीयांच्या मनात जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उदघाटन देशाचे संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत होणार आहे. एकूण १६० किमी ची ही मॅरेथॉन असून यामध्ये १२० किमीची टायगर हिल चॅलेंज मॅरेथॉन,६० किमीची अल्ट्रा मॅरेथॉन, ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन, २१ किमीची हाफ मॅरेथॉन तसेच हौशी स्पर्धकांसाठी १० आणि किमीच्या छोट्या मॅरेथॉन होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण लाखांची पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेला जम्मू काश्मीर पर्यटन विभाग, स्वानंद सामाजिक संस्था, रनबड्डीज आणि सेवक कारगिल यांचे सहकार्य लाभले आहे.

या स्पर्धेमध्ये जास्तीतजास्त भारतीयांनी सहभागी होऊन कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी http://www.kargilmarathon.com/आणि kargil international marathon या फेसबुक पेजला भेट द्यावी.