ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएमपीएमएलच्या मुख्य अभियंता पदी निवृत्ती भांडे

पुणे, दि. ७ - पीएमपीएमएलच्या मुख्य अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार निवृत्ती भांडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पीएमपीएमएलचे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांना तुकाराम मुंढे यांनी निलंबित केल्याने हे पद रिक्त झाले होते. प्रथम श्रेणीतील पदावर मुंढे यांनी तृतीय श्रेणीच्या अधिकाऱ्याची वर्णी लावल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.

रस्त्यांत बंद पडणार्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण १० टक्क्कयांवर आणले नसल्याने तसेच आगारातील अभियंत्यांवर नियंत्रण नसणे, वरिष्ठांना आव्हान देणे या कारणास्तव सुनील बुरसे यांनी मुंढे यांनी दोन दिवसापूर्वी निलंबित केले आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचे मुख्य अभियंता पद रिक्त होते. त्या पदावर निवृत्ती भांडे या तृतीय श्रेणीच्या पदावरील कर्मचार्याची नियुक्ती केली आहे.

मुंढे यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून प्रथम श्रेणीतील पद वर तृतीय श्रेणीच्या अधिकाऱ्याची वर्णी लावल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. निवृत्ती भांडे हे डेपो मेंटेनन्स इंजिनिअर अर्थात आगार अभियंता या तृतीय श्रेणीच्या पदावरील कर्मचारी आहे. त्यांची अद्याप पदोन्नती झालेली नाही. मात्र, त्यांच्याकडे पीएमपीतील प्रथम श्रेणीच्या वर्क्स मॅनेजर पदाचा दोन वर्षांपासून प्रभारी कार्यभार आहे. आता त्यांच्याकडे पीएमपीतील अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य अभियंता हे पद दिले आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळता येणार का ? याची कर्मचार्यांना उत्सुकता आहे.