ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रवाशांना योग्य सुविधा मिळण्याबाबत पुणे रेल्वे मंडळ कायम दक्ष

पुणे, दि. ८ - पुणे मंडळातील रेल्वे स्थानके प्रवाशांना देण्यात येणा-या सुविधांबाबत मंडळ सतर्क असून भविष्यात आणखी चांगल्या सुविधा देण्याचा मानस आहे. रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण, सुरक्षा, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रिक करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत देशात नववा क्रमांक मिळाला आहेअसे पुणे मंडळाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय म्हणाले.

मध्य रेल्वेच्या पुणे मंडळाच्या सल्लागार समितीची बैठक पार पडली बैठकीत उपस्थितांशी दादाभोय बोलत होते. यावेळी बशीर सुतार, मोहन शेटे, भरत देशमुख, राजेंद्र दोषी, शिवनाथ बियानी, रवी जोशी, आयुब तांबोळी, भीमसेन खेडकर, नितीन कांचन, बाबुराव काटकर, विजय भोसले, किसनराव तरमळे, महेंद्र कांबळे, असित गांगुर्डे, अनिल पाटिल, विनोद चोरडिया, आनंद माने, वंदना गायकवाड आदी उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशी सुविधांचा विकास होत आहे. स्थानकाला नवीन एक प्रशस्त वाहनतळासह अतिरिक्त प्रवेशद्वार तयार करण्यात येत आहे. स्थानकाच्या मुख्य भागात अपंगांसाठी रॅम्प बांधल्याने पहिल्या फलाटावरून अन्य फलाटांवर जाण्यासाठी सोयीचे झाले आहे. तसेच पुणे स्थानकावर ओला कॅब सेवेची सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने संपूर्ण देशात पुणे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुणे स्थानकावर ४०० मीटर लांब भिंतीवर वन्यजीव आधारित १०५ चित्रे काढण्यात आली आहेत. तसेच पिंपरी स्थानकावर पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळे अन्य चित्रे काढण्यात आली आहेत. कोल्हापूर स्थानकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष डाक तिकिटाचे अनावरण करण्यात आले. पुणे मिरज लोंढा मार्गाचे दुपदरीकरण, पुणे मिरज कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण, कोल्हापूर वैभववाडी दरम्यान नवा मार्ग निर्माण, पुणे घोरपडीमध्ये पाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आला आहे. पुनर्वापर केलेले पाणी ट्रॅक, प्लॅटफॉर्म, गाड्या स्वच्छतेसाठी तसेच झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. यातून पाण्याची बचत होऊन स्वच्छता सौंदर्यीकरणात भर पडणार आहे, असेही