ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे पुण्यात निधन

पुणे, दि. ११ - आपल्या खुसखुशीत व्यंगचित्रांनी रसिकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे पुण्यात अल्पशा आजाराने राहत्या घरी पहाटे निधन झालेआज दुपारी वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतमंगेश तेंडुलकर हे दिवंगत लेखक विजय तेंडुलकर यांचे कनिष्ठ बंधू होत.

विविध विषयावरील त्यांची व्यंगचित्रे रसिकांना फक्त हसवत नाहीत तर विचार करण्यासाठी प्रेरित करतातविशेषतः पुण्याच्या वाहतुकीविषयी त्यांची व्यंगचित्रे गाजलेली आहेत. ते नियमितपणे दिवाळीच्या सुमारास पुण्याच्या चौकात उभे राहून वाहतुकीविषयक जागृती करणारी भेटकार्डांचे नागरिकांमध्ये वाटप करीत असत.

मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरवली गेली आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांमधून ते सामाजिक समस्यांना वाट देण्याचे काम करीत असत. शिवाय ते सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी होत असतव्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

वयाच्या पंचाहत्तरी नंतरही त्यांनी व्यंगचित्रे रेखाटने सोडले नव्हते. अलीकडेच पुण्यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. साध्या साध्या विषयातून ते अत्यंत बोलकी व्यंगचित्रे रेखाटायचे.