ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

तुकाराम मुंढे आणि आबा बागुल यांच्यात खडाजंगी

पुणे, दि. ११ - पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेले काँग्रेस नगरसेवक आबा बागूल आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी शाब्दिक वाद झाला ,या वेळी बागूल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून, मुंढे यांनाही दमबाजी केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाच्या तक्रारीवरून बागूल यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बागूल हे पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात गेले होते. पीएमपीच्या प्रवाशांना एक दिवसीय मोफत पास देण्याची योजना चर्चेत होती. त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बागूल गेले होते. त्यावेळी मुंढे आणि बागुल यांच्यातील चर्चेच रुपांरत वादात झाले. त्या वेळी बागूल यांनी मुंढे यांना कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकामार्फत तक्रारीचे पत्र पाठविले. 

या बाबत बागुल म्हणाले शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावेत आणि खासगी वाहने वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी पालिकेच्या मुख्यसभेने मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. 
विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपीएमएलला अदा करणार आहे. त्यासाठीच महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतुन मोफत प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारा ठरणार आहे असे असताना पीएमपी प्रशासनाची भूमिकाच नकारात्मक असल्याचे वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला कोणतीही दखल दिल्याने स्पष्ट होत आहे.
त्यामुळे करदात्या पुणेकरांच्या रकमेची लूट होऊ नये आणि पीएमपीचे तूट कमी करण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, पुणेकरांच्या हितासाठी अगदी पीएमपीसेवा रोखून आंदोलन होईल असा इशाराही आबा बागुल Posted On: 11 July 2017