ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महानगरपालिकेतील ३४ गावांच्या समावेशाबाबत येत्या आठवड्यात निर्णय

पुणे, दि. ११ - पुणे  महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांच्या समावेशाबाबतची येत्या शुक्रवार पर्यंत राज्य सरकारला मुंबई हायकोर्टापुढे भूमिका मांडवी लागणार आहे. त्यामुळे या आठवड्या मध्ये ३४ गावाच्या समावेश बाबतचा निर्णय घेणे राज्य सरकारला आवश्यक आहे.

गावांच्या समावेशासाठी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर १२ जून रोजी झालेल्या सुनावणीत या गावांबाबत तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आता पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे त्यावेळी राज्य शासनाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे, मात्र पालिकेत सर्व गावांचा समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे टप्या टप्यात गावचा समावेश करण्या बाबत सरकारचा विचार सुरु आहे.

पहिल्या टप्यात अर्ध समावेशित गावे घेतली जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे उर्वरित गावातील नागरिकांची नाराजी ओढवणार आहे त्यामुळे सरकार सावध पवित्र घेत आहे. असे असले तरी येत्या शुक्रवारी सरकारला आपली भूमिका मांडावी लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात ३४ गावांच्या समावेश बाबत राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.