ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिका क्षेत्रातील घरांना मिळकतकर माफीचा प्रस्ताव

पुणे, दि. १२ - मुंबई महापालिके प्रमाणे पुणे शहरातील सहाशे चौरस फुटांच्या घरांना मिळकत करातून सूट द्यावी असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक बाळा ओसवाल, प्राची आल्हाट आणि पालवी जावळे यांनी स्थायी समितीला दिला आहे.

पुणे महापालिका क्षेत्रात असणाऱ्या ६०० चौरस फुटांच्या सदनिकांना मुंबई प्रमाणे सूट द्यावी असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवकांकडून देण्यात आला आहे. पुणे महापालिकेने केल्या काही वर्षात भोगवटा पत्र घेता वापर केलेल्या घरांना पालिकेतील प्रचलित धोरणानुसार आकारण्यात आलेला ३०० ते ४०० कोटींचा दंड माफ करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने ६०० चौरस फुटांच्या घरांना मिळकत करात सूट देण्यास हरकत नाही असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.