ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तरुण आयटी इंजिनीअरची आत्महत्या

पुणे, दि. १३ - नोकरीची शाश्वती नसल्याने २५ वर्षाच्या आयटी इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा आंध्रप्रदेशचा रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागला होता.

आंध्रप्रदेशमध्ये राहणारा २५ वर्षाचा गोपीकृष्ण दुर्गाप्रसादने पुण्यापूर्वी दिल्ली, हैदराबादमधील आयटी कंपनीमध्ये काम केले होते. तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आयटी कंपनीमध्ये कामाला लागला होता. कंपनीतर्फे त्याची विमान नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. बुधवारी पहाटे गोपीकृष्णने हॉटेलच्या खोलीत हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याने हाताच्या मनगटावर तब्बल २५ वेळा चाकूने वार केले. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर तो हॉटेलच्या गच्चीवर गेला आणि तिथून उडी मारली. पहाटे चारच्या सुमारास हॉटेलच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोपीकृष्णला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

आत्महत्येपूर्वी गोपीकृष्णने सुसाईड नोट लिहीली होती. यात त्याने लिहिले आहे की, ‘आयटी क्षेत्रात आता नोकरीची शाश्वती नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते.’ गोपीकृष्णच्या नातेवाईकांनीही त्याने टोकाचे पाऊल का उचलले यावर आश्चर्य व्यक्त केले. ‘गोपीकृष्ण चांगला मुलगा होता. त्याचे कामही चांगले होते. त्याला कोणतेही व्यसन नव्हते’ असे गोपीकृष्णच्या नातेवाईकांनी सांगितले. 

केंद्र सरकार रोजगारीच्या कितीही वल्गना करीत असले तरी वस्तुस्थिती आता उघड होऊ लागली आहे. गोपीकृष्णच्या आत्महत्येनंतर आयटी क्षेत्रातील भीषण वास्तव समोर आले आहे. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. आता कर्मचारी कपातीविरोधात लढा देण्यासाठी युनियनची स्थापना करण्याचा निर्धार आयटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.