ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे, दि. १३ - कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं आहे. मात्र पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे.

निर्भयाचं स्मारक तयार करणं म्हणजे तिची अवहेलना करण्यासारखं आहे, असा दावा करत संभाजी ब्रिगेडने पुण्यात भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळला. त्याचबरोबर आज कोपर्डीत होणारा स्मारक अनावरणाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचं भूमिपूजन झालं आहे.

साधारणपणे ५० बाय ५० फूटाचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या मध्यभागी पितळी धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. स्मारकाशेजारीच लिंबाचं झाडही असेल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे. पीडित कुटुंबीयांच्या शेतात हे स्मारक बांधण्यात येत आहे.

राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. तसंच आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहेत.

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

नराधमांना फासापर्यंत पोहोचविणार - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले की, आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.