ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, दि. १४ - सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बीबीएच्या फर्स्ट इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. काल (गुरुवार) रात्री १० वाजता ही घटना उघडकीस आली. राहुल अनिल अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल आपल्या तीन मित्रांसह विमाननगर येथे फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. ते मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राहुल काल कॉलेजमधून लवकर घरी गेला होता. तेव्हा त्याचे मित्र रूमवर नव्हते. त्याचे मित्र रात्री १० वाजता घरी आले. त्यावेळी आतून दरवाजा बंद होता. खूप वेळ बेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने राहुलच्या मित्रांनी पोलिसांना बोलावले. तेव्हा आतमध्ये त्यांना राहुल मृतावस्थेत आढळून आला. मात्र राहुलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.