ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवशक्ती को.ऑप.क्रेडीट सोसायटीत ६.५ कोटीचा अपहार

पुणे, दि. १४ - बाणेर येथील शिवशक्ती को.ऑप.क्रेडीट सोसायटीत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सोसायटीचे अधिकारी, पदाधिकारी संचालकासह १० जणांवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील बाणेर भागात या सोसायटीची शाखा आहे. याप्रकरणी विशेष लेखा परीक्षक संजय कृष्णा पाटील (वय ४५, रा. खेसे पार्क, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली असून बाळकृष्ण यशवंत पोळ आणि इतर नऊ जणांवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शिवशक्ती को.ऑप.क्रेडीट सोसायटीचे२०१५-१६ या वर्षाचे ऑडीट केले असता हा अपहार उघडकीस आला. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी केलेल्या पडताळणीनुसार सध्या बँकेत रोख कोटी ६४ लाख २० हजार ३९२ इतकी रक्कम शिल्लक असणे गरजेचे असताना फक्त २४ हजार २९५ इतकीच रक्कम शिल्लक असल्याचे दाखविण्यात आले. त्यावरून या बॅँकेत करोड ६३ लाख ९६ हजार ९७ रुपये इतका अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी संचालक यांनी संगनमताने अपहार करून सभासद ठेविदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.