ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

त्यांच्यात दडलाय महत्वाकांक्षी राजकारी - आमदार डॉ. नीलम गो-हे

पुणे, दि. १५ - पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात महत्वाकांक्षी राजकारणी दडला आहे. ते आज ना उद्या जनतेला जनादेश मागतील असे मला वाटत असल्याचे शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी सांगितले. काल (१४ जुलै) झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी विचारले असता त्या बोलत होत्या.

डॉ. गो-हे पुढे म्हणाल्या की, त्यांची काम करण्याची पद्धत ही मी म्हणेन ती पूर्व अशा पद्धतीची असल्यामुळे त्यांचे सतत कोणाशी ना कोणाशी वाद होत असतात. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणाहून त्यांच्याविषयी प्रतिक्रीया येत असतात. मुंबईतही आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांच्याकडून महापौर, नगरसेवकांचा, लोकप्रतिनिधींचा अवमान होणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे आदी आरोप करून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

पीएमपीएमएलचे काम सुरू केल्यानंतर त्यांचे महापौर आणि इतर राजकीय पदाधिका-यासोबत वाद झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला होता का, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह इतरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. नंतर एका भेटी दरम्यान हा वाद निवळलाही होता.