ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महानगर पालिका उभारतीये मृत प्राण्यांसाठी विद्युतदाहिनी सुरू

पुणे, दि. १५ - पाळीव प्राणी मृत झाले की त्यांच्या शरीराची विल्हेवाट कशी लावायची  हा खुप मोठा प्रश्न होता. बंगल्याच्या आवारात, मोकळ्या जागेत, त्यांचे दफन केले जाते. बेवारस प्राण्यांना तर उकिरड्यावरही फेकून दिले जाते. या समस्येवर पुणे महानगरपालिकेने खास प्राण्यांसाठी विद्युतदाहीनी सुरू केली आहे.

आयुष्यभर जपलेल्या प्राण्याची ते मेल्यावर हेळसांड होउ नये यासाठी पुणे महापालिकेतर्फे मुंढवा येथे विद्युतदाहिनी उभारण्यात आली आहे. शहरात पाळीव प्राणी, बेवारत प्राणी, आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्यू पावणारे प्राणी यांची संख्या भरपूर आहे. त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारची स्मशानभूमी उभारली जावी याबाबतचा ठराव २०१५ साली स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला होता.

नुकताच त्याबाबतचा फेर अभिप्राय आयुक्तांकडून आलेला आहे. त्यानुसार मुंढवा केशवनगर सर्वे क्र मध्ये पुणे महापालिकेच्या वतीने मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर प्लांट (विद्युत दाहिनी) उभारण्यात आला असून लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. या प्लांटमध्ये मृत प्राण्यांच्या शरीराची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.