ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नगरसेविका जठार यांचे जात प्रमाणपत्र अवैध, भाजपाला दुसरा धक्का

पुणे, दि. १५ -  पुणे महापालिका प्रभाग क्रमांक च्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका किरण निलेश जठार यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. महार जातीचा दावा जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. भाजपाला हा दुसरा मोठा धक्का बसला असून या पूर्वी नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचा जातीचा दाखला विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे.

किरण निलेश जठार यांनी आपण महार असल्याचा दावा केला होता. त्याआधारावर त्यांनी भाजपतर्फे प्रभाग क्र मधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या. मात्र नुकतेच जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचा हा दावा अवैध ठरविला असून त्याबाबतचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे.

या निर्णयामुळे जठार यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून भाजपाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. या पूर्वी वडगाव शेरी मतदार संघातील फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक दोनच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरविण्यात आले होते. प्रचंड मताधिक्याने पुणे महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाला धक्का बसला आहे.