ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यांतर्गत पहिला गुन्हा पुण्यात दाखल

पुणे, दि. १७ - वेगळ्या जातीतील मुलांसोबत लग्न केल्याचा कारणावरून जातीतून बहिष्कृत करण्यात आलेल्या कुटूंबियांना एकत्र येत याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. संबंधित पंचाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात जुलैपासून जात पंचायत विरोधी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा लागू करण्यात आल्यानंतर दाखल होणारा हा पहिलाच गुन्हा असेल.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील कोंढवा परिसरात तेलगू मडेलवार परीट समाजाचे काही कुटुंबीय वास्तव्यास आहेत. यातील एका मुलीचे लग्न दुस-या जातीतील मुलासोबत केल्याच्या कारणावरून या समाजातील काही पंचांनी ४० कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत केले होते. त्यामुळे त्या कुटुंबीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा लागू झाल्याची माहिती मिळताच बहिष्कृत केलेल्या कुटुंबीयांतील १४ जणांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधित पंचांविरोधात तक्रार दिली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना शिक्षेची तरतूद असणारा कायदा जुलै २०१७ महाराष्ट्रात लागू झाला असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. यापूर्वी जात पंचायत विरोधात कोणताही कायदा अस्तिवात नसल्यामुळे भारतीय दंड विधान संहितेच्या कोणत्या कलमांचा आधार घ्यायचा याबाबत पोलिसांत संभ्रम असायचा. परंतु आता सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाच लागू झाल्याने हा संभ्रम संपला असून सामाजिक बहिष्कार घालणा-या व्यक्तींना तीन वर्षापर्यंतचा कारावास किंवा एक एक लाख रुपये दंडात्मक रक्कम किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होतील, अशा शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.