ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे, दि. १८ -  राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी एका वकील महिलेने फिर्याद दिली आहे़ लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने म्हटले आहे.

पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहेरोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे

गेल्या दहा वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. पीडित महिला आणि रोहित टिळक यांची दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला आणि गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. लग्नाची मागणी केल्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाणही  करण्यात आली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.राेहित टिळक यांनी अापली अार्थिक फसवणूक केल्याची तक्रारही सदर महिलेने केली अाहेफिर्यादी महिला मुंबई उच्च न्यायालयात वकिली करते.

राेहित यांच्याकडून हाेणाऱ्या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता तसेच अाराेपीच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पीडित महिलेने जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती

गेल्या आठवड्यात पीडित महिलेनं याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. अखेर काल (सोमवारी) तिने विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या तपास सुरु आहे.

रोहित टिळक यांनी २००९ आणि २०१४ साली गिरीश बापट यांच्याविरुध्द कसबा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.