ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अभियंता, जनमित्रांना सतर्कतेचे निर्देश

पुणे, दि. १८ - संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता जनमित्रांनी सतर्क तत्पर राहावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी दिले आहेत.

पुणे शहर ग्रामीण भागात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांच्याकडून सर्व विभागातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा दररोज सकाळी सायंकाळी आढावा घेण्यात येत आहे तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्गदर्शन सूचना करण्यात येत आहेत.

मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी सांगितले, की शक्यतो वीजपुरवठा खंडितच होणार नाही यासाठी अभियंता जनमित्रांनी संबंधित वीजयंत्रणेवर लक्ष ठेवावे. पावसामुळे वीजयंत्रणेत होणारे संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. गंभीर बिघाड असल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्रीय राहावे, अशी सूचना त्यांनी केली आहे

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे नागरिकांनाही वीजअपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध - शहरी ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.