ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिका करतीये कचऱ्यातील प्लस्टिक पिशव्यांतून विटांची निर्मिती

पुणे, दि. १८ - प्लास्टिक कॅरीबॅग्जची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. याबाबत विविध प्रकारचे संशोधन सुरु आहे. आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅगच्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजार एक वर्ष लागतात. या प्लस्टिक पिशव्यांच्या पुनर्वापरासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये खासगी संस्था आणि पुणे महापालिकेच्या वतीने प्लस्टिक पिशव्यांपासून भूमिगत विद्युतवाहिन्या (इलेक्ट्रॉनिक वायर) बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटा तयार केल्या जातात.

पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाशेजारी एका खासगी ठेकेदाराकडून विटा निर्मितीचा चालविला जात आहे. या ठिकाणी दररोज महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमधून दररोज पिशव्या येतात. या पिशव्यांना स्वच्छ धुऊन त्याची भुकटी केली जाते.

त्यानंतर उच्च तापमानामध्ये वितळून त्याच्या छोट्या विटा तयार केल्या जातात. त्या विटा विजेच्या वायर तयार करणाऱ्या कंपन्यांना पुरवल्या जातात. या प्रकल्पामध्ये सुमारे १५ ते २० जण काम करतात. प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुनर्वापरामुळे पर्यावरणपूरक विटा बनविण्याचा हा प्रकल्प महापालिकेकडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चालविला जात आहे.

कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण ४० ते ६० टक्के असते. त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पूर्वी हा कचरा जाळला जायचा; परंतु गेल्या काही वर्षांपासून आपण प्लॅस्टिक वितळून त्यातून विद्युतवाहिन्या बनविण्यासाठी प्लॅस्टिकच्या विटा तयार केल्या जात आहेत. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी हा प्रकल्प सध्या सुरू आहे. दोन ते तीन टन प्लॅस्टिक पिशव्यांचा पुनर्वापर यामध्ये केला जात आहे अशी माहिती महापालिका सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.