ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सामाजिक कार्यकर्ते ताहेरभाई पुनावाला यांचे निधन

पुणे, दि. १ सामाजिक कार्यकर्ते ताहेरभाई पुनावाला यांचे पुण्यात काळ सोमवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी  आणि एक नात आहे. त्यांच्या पार्थिवाचे देहदान आज सकाळी दहा वाजता साने गुरुजी रुग्णालय, हडपसर येथे करण्यात आले.

सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ आणि माजी कोषाध्यक्ष असलेले ताहेरभाई विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ते होते. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.