ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवासाठी २ कोटीची मंजुरी

पुणे, दि. २ - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली असून त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सर्वसाधारण्पणे १७ उपक्रम राबवण्यात येणार असून प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.

संपूर्ण जगाला सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी देणारा पुणे शहराचा गणेशोत्सव यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये बोधचिन्ह निर्मिती, सर्व माध्यमातून प्रसिद्धी, स्मरणिका, छायाचित्र प्रदर्शन, शाळा-महाविद्यालयांमध्ये गणेश स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

यातील दोन कोटींच्या खर्चामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वाधिक ७० लाखांचा खर्च केला जाणार असून बोधचिन्ह तयार करण्यासाठी सर्वात कमी म्हणजे ५० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एकाचवेळी शहरासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याचा विक्रम करण्याचा महापालिकेचा मानस असून त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.