ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पीएमपीएमएलच्या चालकाची ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

पुणे, दि. २ - पुणे शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएमपीएमएलच्या चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत पीएमपीएमएलचा चालक ज्येष्ठ नागरिकाला बसमधून बाहेर आणून शिवीगाळ करत गचांडी धरून मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, हा प्रकार कधी घडला याप्रकरणी अद्याप माहिती मिळाली नसली तरी पुणे शहरातील पीएमपीएमएल बस चालक कंडक्टर कशाप्रकारे प्रवाशांसोबत अरेरावी करत असतात ते उघड झाले आहे. नागरिकांशी अरेरावी, उद्धट वर्तन, प्रवाशांनी बसमधून उतरण्यापूर्वीच बस पुढे नेणे, अशिक्षित नागरिकांना अपमानित करणे यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पीएमपीएमएलच्या अधिकारी कर्मचा-यांना शिस्त लावणारे तुकाराम मुंढे अशा गुंड प्रवृत्तीच्या चालकांवर निलंबनाची कारवाई करतील का ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.