ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठा मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी सहा ऑगस्ट रोजी पुण्यात दुचाकी रॅली

पुणे, दि. ३ - मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी येत्या रविवारी ( ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पुणे शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने आज (गुरुवारी) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या रॅलीस गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरवात होईल. त्यांनतर पुणे शहरात जनजागृती करत ही दुचाकी रॅली डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुषप्हार अर्पण केल्यानंतर भिडे पुलाजवळील नदीपात्रात समारोप होईल.

पुणे शहरातील ही रॅली पुणे शहराच्या आजवरच्या इतिहासातील सर्व उच्चांक मोडून काढेल असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.मराठा क्रांती मोर्चात जी शिस्त पहावयास मिळाली तीच शिस्त बाईक रॅलीमध्येही पाहण्यास मिळेल असेही आयोजकांकडून सांगण्यात आले.