ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता एका क्लीकवर बसणार पुणे परिसरातील गुन्हेगारांवर वचक

पुणे, दि. ४ - पुणे दक्षिण विभागाचे अपर आयुक्त शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्ट्रीशिटर्श अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुगल लिंक पोलीस १९ ठाण्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये पुणे शहर उत्तर प्रादेशिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

ही लिंक काल (गुरुवारी) उत्तर प्रादेशीक विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम तांत्रिक तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी ही लिक तयार केली आहे.

महापालिकांच्या निवडणुकीच्या काळात हिस्ट्रीशिटर्सची गुगल मॅपवर लिंक तयार करण्याचे काम कदम नदाफ यांनी सुरु केले होते. त्यांच्या या कामाची नोंद घेत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी त्यांच्या प्रयोगाची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांना दिली. प्रयोगाची माहिती घेत साकोरे यांनी या दोघांना अशीच लिंक परिमंडळ चार उत्तर प्रादेशिक विभागाकरिता बनविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार १९ पोलीस ठाण्यांच्या ३६२ हिस्ट्रीशिटर्सच्या लिंक तयार करुन दिल्या आहेत. त्यांच्या या कामासाठी दीपेन कदम, गुलाब शिवले, शरद बांगर, गणेश पाटोळे तसेच १९ पोलीस ठाण्याच्या कर्मच्या-यांनी त्यांना मदत केली आहे.

या गुगल लिंकचा वापर करुन पोलीस दलातील कोणताही अधिकारी कर्मचारी धडक गुन्हेगारांच्या घरी पोहचू शकतो. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक अधिक वाढणार आहे, अशी अपेक्षाही अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केलीसध्या ही लिंक केवळ परिमंडळ चारसाठी बनवलेली असली तरी संपूर्ण पुणे शहराच्या पोलीस ठाण्यांसाठी अशीच गुगल लिंक तयार करण्याचे काम सुरु आहे. या सर्व लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी एक मोबाईल अॅप्लीकेशनही लवकरच बनविण्यात येणार आहे.