ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ प्रवाशाला मारहाण करणाऱ्या चालक, वाहकाची खातेनिहाय चौकशी

पुणे, दि. ५ - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बस थांब्याजवळ ज्येष्ठ प्रवाशाला मारहाण केल्या प्रकरणी पिंपीएमएलच्या संबधित बसचालक सतीश धोंगडे वाहक नवनाथ यादव यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच त्यांना (No Duty) काम थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे

मंगऴवारी (दि. ) इर्जात इक्रामुद्दीन पिरजादे (वय ६६, रा. दापोडी) हे जिल्हाधिकारी कार्यालय बसथांब्यावर दापोडीला जाण्यासाठी थांबल होते. त्या वेळी पुणे स्थानक आगाराची बस तेथे आली. मात्र, ती बस थाब्यावर थांबली नाही. पुढे जाऊन बसचा वेग कमी झाल्याने पिरजादे बसमध्ये चढले. पिरजादे यांनीबसस्टॉपवर गाडी का थांबविली नाहीस?’ असा जाब संंबंधित चालक, वाहकाला विचारला. तसेच याविषयी तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सागितले

त्यावर चालक सतीश धोंगडे आणि वाहक नवनाथ यादव यांनी प्रवाशाला मारहाण केली. त्यानंतर या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराची पीएमपीएल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चालक, वाहकाच्या या वर्तनाचा अहवाल एस. एन. चव्हाण यांनी महमंडळाकडे सादर केला असून त्यांची खातेनिहाय चौेकशी सुरु करण्यात आली आहे.  

दरम्यान, कोथरुड आगारातील पीपीपी तत्वावरील वारजेमाळवाडी ते वाघोली मार्गावरील बसमध्ये चढत असताना चालकाने दरवाजा बंद केल्याने मुलीचा एक पाय अडकून पायाला जबर इजा झाली. या प्रकाराबाबत चालक किरण मांडगे आणि वाहक नरेश ठावूâ यांना नो ड्यूटीचा आदेश देण्यात आला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केली आहे